सांबशिवाष्टक
विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.
( इंदुवदना वृत्त. )
काय करि कालकलि नीलगल चितीं ?
ध्याल जरि वालभरि बैसुनि निवांतीं ।
भालशिखि बालशशिमंडण भवारे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥१॥
गांगजळ, बिल्वदळ, तंदुलतिलांनीं,
कोकनद, कुंद, करवीर, कुसुमानि ।
धूपबलिदीपयुत अर्पुनि पुजा रे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥२॥
देववर भीतिहर शंकर उमेशा
कामरिपु कोमलमनोज्ञतरवेषा ।
शूलबाखङ्गधनुहेतिधरणा रे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥३॥
पर्वतसुतारमण शर्व सुखराशी
दीनजनपालनसमर्थ विपदांसी ।
नासुनि निजात्मपद देत सुजना रे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥४॥
भति अति शुभ्र विभुचर्चित निजांर्गी
शारदपयोदनिभ भासत सुयोगी ।
कृत्तिकृतवास अविनाश भजा रे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥५॥
मूळ अमरांसि अमरागसम पाहा
कामित मनोरथफलांसि पुरवी हा. ।
नामजपमात्र करितांचि मनुजा रे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥६॥
१निर्मळ पदांबुरुह अर्चन परातें
पूर्ण पददान करणार विभु हातें ।
हाचि परमेश परतत्त्व समजा रे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥७॥
इंदुवदना अनुपमान ललितांगी
कल्पलतिकासम अखंडित अलिंगी ।
तोचि कुळदैवत तया शरण जा रे
सांब शिव सांब शिव सांब शिव गा रे. ॥८॥
सांबशिवपावनसुधाष्टक बनाजी
किंकर सदंतर रचोनि पद पूजी ।
पाठ करितील शिवभक्त जरी भावें
मुक्तिनवरी वरील शंकरविभावें ॥९॥
इति निरंजनमाधवविरचित सांबशिवाष्टकं.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP