मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|स्फुट कविता संग्रह|
गंगाष्टक

गंगाष्टक

विविध कवींच्या प्राचीन कविता शके १८२७ मध्ये श्री. भावे यांनी प्रसिद्ध केल्या.


निवास शंभुमस्तकीं । मनास तो प्रशस्त कीं ॥
प्रसिद्ध देव आगमी । नमीन माय गौतमी ॥१॥
अपूर्व नीर वाहतें । सुधेसमान भासतें ।
मुनींद्र देव संगमीं । नमीन माय गौतमी ॥२॥
तनू भिजे तुझ्या जळें । तरीच भाग्य आगळें ॥
वदे चरित्र काय मी । नमीन माय गौतमी ॥३॥
तरी अखंड वाहती । जितेचि मुक्त पावती ॥
वरिष्ठ मोक्षलक्षुमी । नमीन माय गौतमी ॥४॥
तुझें स्वरूप देखिलें । तयासि सर्व फावलें ॥
जगांत तूं पराक्रमी । नमीन माय गौतमी ॥५॥
जनासि ज्ञानही नसे । तुझ्याच चिंतनीं वसे ॥
पडेचिना भवभ्रमीं । नमीन माय गौतमी ॥६॥
अवो, तुला न गाइलें । मनीं कदां न ध्याइलें ॥
ममापराध हे क्षमी । नमीन माय गौतमी ॥७॥
गोसाविनंदनाचिया । पठेल अष्टकास या ॥
रमेल तो सुखाश्रमी । नमीन माय गौतमी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP