लग्नाची गाणी - जतरा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
जतरा
उंगवतचे बाजूला रं, कायमा गरारेला रं
कायमा गरारेला रं, चांद-सूरया चढेला रं
चांद-सूरया चढेला रं, आरथु गरारेला रं
मालवतचे बाजूला रं, चांदणी झलालेली रं
चांदणी झलालेली रं, चांदणी नको म्हणू रं
चांदणी नको म्हणू रं, महालक्ष्मी देवू रं
तेहू देवीची जतरा रं, जतरा भरेली रं
जतरा भरेली रं, सिपाय पाठोपाठी रं
सिपाय पाठोपाठी रं, कोंबडी खाण्यासाठी रं
जत्रा
उगवतीच्या दिशेला रे, काय खडखडले रे
काय खडखडले रे, चंद्र-सूर्य चढले रे
चंद्र-सूर्य चढले त्यांचा रथ खडखडला रे
मावळतीच्या दिशेला रे, चांदणी झळकली रे
चांदणी झळकली रे, चांदणी म्हणू नये रे
चांदणी म्हणू नये रे ती महालक्ष्मी देवी रे
त्याच देवीची जत्रा रे, ही जत्रा भरली रे
जत्रा भरली रे, आले शिपाई पाठोपाठी रे
शिपाई पाठोपाठी रे, कोंबडी खाण्यासाठी रे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP