लग्नाची गाणी - पैंजण
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पैंजण
बाय् मी बारवंवं पाण्या गेल्या
बाय् माझे बारवंला आलाय् पूर
बाय् मी खेळते बारवंवरी
बाय् माझा खेलता हरवला
बाय् हरवला पायीचा पैंजण
बाय् गवसला धाकले दिराला
बाय् देत नाही धाकला दीर मलां
बाय् माझापायीचा पैंजण
(बारव-पायर्यांची विहीर)
पैंजण
बाई मी बारवेवर पाण्याला गेले
बाई माझ्या बारवेला आलापूर
बाई मी खेळते बारवेवर
बाई माझे खेलताना हरवले
बाई हरवले पायीचे पैजण
बाई सापडले धाकट्या दिराला
बाई देत नाही धाकटा दीर मला
बाई देत नाही माझे पायीचे पैंजण
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP