मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
चालत लक्ष्मी घरात आली

लग्नाची गाणी - चालत लक्ष्मी घरात आली

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.

चालत लक्ष्मी घरात आली
चालत लक्ष्मी घरात आली,चालत लक्ष्मी घरात आली
काय ग पाहिते, काय ग लक्ष्मी पाहिते?
मी तं पाह्यतां घरांदारां, मी तं पाह्यतां सासू-सासरां
सासूसासर्‍यांशी घर भरलाये, घर भरलाये...

चालत लक्ष्मी घरात आली,चालत लक्ष्मी घरात आली
काय ग पाहिते, काय ग लक्ष्मी पाहिते?
मी तं पाह्यतां घरांदारां, मी तं पाह्यतां गायीचं गोठं
गायी-गोजरांशी घर भरलाये, घर भरलाये...

चालत लक्ष्मी घरात आली,चालत लक्ष्मी घरात आली
काय ग पाहिते, काय ग लक्ष्मी पाहिते?
मी तं पाह्यतां घरांदारां, मी तं पाह्यतां भाताची कोठारां
भाताचे कोठारांशी घर भरलाये, घर भरलाये...

चालत लक्ष्मी घरात आली,चालत लक्ष्मी घरात आली
काय ग पाहिते, काय ग लक्ष्मी पाहिते?
मी तं पाह्यतां घरांदारां, मी तं पाह्यतां पैशांच्या पेट्या
पैशांच्या पेट्याशी घर भरलाये, घर भरलाये...

चालत लक्ष्मी घरात आली
चालत लक्ष्मी घरात आली, काय ग लक्ष्मी पहाते?
मी तर पहाते घरदार, मी तर पहाते सासूसासरे...
सासूसासर्‍यांच्या गोतावळ्याने घर आहे भरले!

चालत लक्ष्मी घरात आली, काय ग लक्ष्मी पहाते?
मी तर पहाते घरदार, मी तर पहाते गायींचे गोठे...
गायीवासरांनी गोठे आहेत भरले, घर आहे भरले!

चालत लक्ष्मी घरात आली, काय ग लक्ष्मी पहाते?
मी तर पहाते घरदार, मी तर पहाते तादुळाची कोठारं...
तादुळाच्या कोठारांनी घर आहे भरले, घर आहे भरले!

चालत लक्ष्मी घरात आली, काय ग लक्ष्मी पहाते?
मी तर पहाते घरदार, मी तर पहाते पैशांच्या पेट्या...
पैशांच्या पेट्यांनी घर आहे भरले,  घर आहे भरले!

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP