मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
ऐपत

लग्नाची गाणी - ऐपत

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


ऐपत
आंब्याची साल पिकसं हाय
आंबी दिसायला चिकनी हाय
अंगठी करायची होती ग बाय
आंबीच्या बाबाची ऐपत नाय
ऐपत नाय त्याचं कारण काय
शहापूरला सोनार राहिले नाय

आंब्याची साल पिकसं हाय
आंबी दिसायला चिकनी हाय
पाट्ट्या करायच्या होत्या ग बाय
आंबीच्या बाबाची ऐपत नाय
ऐपत नाय त्याचं कारण काय
शहापूरला सोनार राहिले नाय

कारण
आंब्याची साल पिकली आहे
आंबी दिसायला विकणी आहे
अंगठी करायची होती ग बाई
आंबीच्या बाबाला जमत नाही
जमत नाही त्याचं करण काय
शहापूरला सोनार रहिले नाहीत

आंब्याची साल पिकली आहे
आंबी दिसायला विकणी आहे
पैंजण करायची होती ग बाई
आंबीच्या बाबाला जमत नाही
जमत नाही त्याचं करण काय
शहापूरला सोनार रहिले नाहीत

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP