लग्नाची गाणी - जाईबाई नवरी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
जाईबाई नवरी
लाडा ग लुडाचे जाईबाई नवरी
बापा ग s वाचूनी तुला जन्म कोण देईल?
आई ग s वाचूनी तुला थान कोण पाजील?
बहिणी ग s वाचूनी तुजा करा कोण धरील?
भावा ग s वाचूनी तुला मुल कोण येईल?
मामा ग s वाचूनी तुला मांडीवं कोण घेईल?
काका ग s वाचूनी तुजे काकणं कोंण बांधील?
(मुल-माहेरी नेण्यास येणारा माणूस, करा धरणे/काकण बांधणे-लग्नातील विधी)
जाईबाई नवरी
लाडात बाढलेल्या हे जाईबाई नवरी
बापावाचून तुला जन्म कोण देईल?
आईवासून तुला स्तन्य कोण पाजेल?
बहिणीवासून तुझ्या लग्नात करा कोण धरेल?
भावावाचून तुला मुळारी कोण येईल?
मामावाचून तुला माडीवर कोण घेईल?
काकावाचून लग्नात तुझे काकण कोण बाधेल?
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP