लग्नाची गाणी - झोका
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
झोका
बांध बांधील ढेपुल्यांचा
त्यावं लावीला निंबारा
त्यालं फ़ुटीला दोन्ही पाट
एक झेला ये उंगवात
एक झेला ये माळवात
त्यालं टोकीला पाळणा
त्यात बसवली कुसुमनवरी
झोका घालते कुसुमनवरीला
(ढेपुली-ढेकूळ, पाट-फ़ाटा, झेला-झुबका, उंगवात-पूर्व दिशा, माळवात-पश्चिम दिशा)
झोका
बांध बांधला ढेकळांचा
त्यावर लावले निंबोणीचे झाड
त्याला फ़ुटल्या दोन फ़ांद्या
एक झुबका गेला उगवतीला
एक झुबका गेला मावळतीला
त्याला बांधला झोका
त्यात बसवली कुसुमनवरी
झोका देते कुसुमनवरीला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP