लग्नाची गाणी - वेठ
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वेठ
भिनारच्या पोरी खंय ग गेल्या
माहोलीच्या दुरुंगाखाली ग वेठीला नेल्या
नेल्यानं नेल्या कोलननी केल्या
डोकीवं देल्या मांदेल्याच्या पाट्या
मांदेली विकीत्यान, डोकी चावीत्यान
भिनारच्या पोरी खंय ग गेल्या
माहोलीच्या दुरुंगाखाली ग वेठीला नेल्या
नेल्यानं नेल्या टकलनी केल्या
डोकीवं देल्या नरलाच्या पाट्या
नारला विकीत्यान, कवट्या चावीत्यान
(वेठीला-वेठबिगारीसाठी, कोलननी-कोळीणी, मांदेली-एक प्रकारचा
मासा, खंय-कुठे, दुरुंग-डोंगर, टकलनी-खिश्चन/केस कापलेल्या)
वेठ
भिनार गावच्या मुली कुठे गं गेल्या
माहुली डोंगराखाली वेठबिगारीला नेल्या
नेणार्याने नेल्या आणि कोळीणी केल्या
डोक्यावर दिल्या मांदेल्यांच्या टोपल्या
मांदेल्या विकतात, डोके चावतात
भिनार गावच्या मुली कुठे गं गेल्या
माहुली डोंगराखाली वेठबिगारीला नेल्या
नेणार्याने नेल्या आणि टकल्या बनवल्या
डोक्यावर दिल्या नारळांच्या टोपल्या
नारळ विकतात, करवंट्या चावतात
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP