लग्नाची गाणी - धूला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
धूला
गिरण बांधली लोखंडाची
तेल गलतंय आशिटाचं
डबं भरलंत राकेलाचं
डबं राजाच्या ग कचेरीला
त्याचे बनवले बंगले
बंगले बनवले त्याने
रस्त्यावरी फ़ेकून दिले
सार्या रस्त्याचा धूला केला
(बंगला-बॉंब, धूला-धुव्वा)
धुव्वा
गिरणी बांधली लोखंडाची
तेल गळतंय ऍसिडचं
डब्बे भरलेत रॉकेलचे
डब्बे राजाच्या कचेरीत नेले
तेथे त्याचे बनवले बंगले
बंगले बनवून राजाने
रस्त्यांवर फ़ेकले
सगळ्या रस्त्यांचा धुव्वा उडवला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP