लग्नाची गाणी - सरकाराला नेट
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
सरकाराला नेट
बारीक माझा बंधू ग आई
उठीला संदू कंदू ग आई
घरा तुझा बंधू ग आई
घरा तुझा पेठ सरकाराला नेट
वीजं तुझा वरू चालीला चमकत
पाण्या तुझा वरू चालीला पडत
ढगा तुझा वरू चालीला गर्जत
(घराचा पेठ-चौकट, वरू-वर/नवरा)
लाळजी सरकारलाच
बारीक माझा भाऊ ग आई
असे दुबळा बिचारा ग आई
तुझे घरही असेच भावासारखे ग आई...
घराला लाकडी चौकट करू
तिची काळजी सरकारलाच.....
विजे, तुझा वर चालताना चमकतो
सरी, तुझा वर चालताना पडतो
ढगा, तुझा वर चालताना गर्जतो
जंगलातील लाकूडतोडीला बंदी असल्यामुळे घरासाठी लाकूड तोडले तर सरकारच ’काळजी ’ घेईल असे म्हटले आहे.
ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच ज्याला त्याला जोडीदार/ घर/ परिसर मिळतात. तो जसा असेल तसेच त्याचे नशीबही असते असा मथितार्.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP