लग्नाची गाणी - ढवाळी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
ढवाळी
शेती पेरली ग मेथी
मेथी मवूरा आली ग
ईश्वर दोघां पाराबती
दोघां सोंगट्या खेळती
जिंकला पाराबतीचा मोती
दे रे देवा माझा मोती
मला देवू रं हासती
तुला कशाला हासती जन्मांच्या ढवाली
आपल्या जन्मांच्या ढवाली
तुला देवू कशाला हसती
चेष्टा
शेती पेरली ग मेथी
मेथी फ़ुलून आली ग
शंकर आणि पार्वती
दोघे सोंगट्या खेळती
जिंकला पार्वतीचा मोती
दे रे देवा माझा मोती
मला रे देवा हासताती
तुला कशाला हसतील?
आपल्या या जन्मोजन्मीच्या चेष्टा
तुला देव कशाला हसतील?
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP