लग्नाची गाणी - लाविलाता टिळा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
लाविलाता टिळा
भूमी परथमीची न् बाय थाळी बनवली
पाराबती राणीनं न् माझे बाय पाराबती राणीनं
पाराबती राणी गेली शंकरू माळाले
तेला उभा का राह्यालं जागा कोठे होता
ते वि शंकाराने जागा घेतला बांधून
शंकर बोलतो माझ्या टिळा का लावशील
तवा होशील माझी राणी
पाराबती राणीनं कसा लाविलाता टिळा
(टिळा लावणे-विवाहनिश्चिती करणे, परथमी-पृथ्वी, पाराबती-पार्वती)
लावला टिळा
पार्वतीराणीने भूमी-पृथ्वीचा तबक बनवले
आणि शंकराच्या माळाकडे गेली
तर शंकराला उभे राह्यला जागाच कोठे होती?
मग शंकराने स्वथ्पुरती नवी जागा निर्माण केली
आणि म्हणाला, ’टिळा लावलास तर
माझी राणी होशील’
पार्वती राणीने त्याला टिळा लावला
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP