लग्नाची गाणी - वनीची वनमोरा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
वनीची वनमोरा
उंबराचे बनाखाली रामानं खणिली बावी
ते ग बावीचा कालनिला पाणी
ते ग पाण्यावं येती वनीशी वनमोरा
पाणी ग पिऊनी मोर संतोषी झाला
तेथून मोरानं उडान घेतला
जाऊन पडला केलनीचे बनी
केलनीचे बना गोरी कशानं कोमेली
जयाबाईने लगना, केली साटा मारून नेली
तेथून मोरानं उडान घेतला
जाऊन पडला सोपार्याचे बनी
सोपर्याचे बना गोरी कशानं कोमेली
जयाबाईने लगना, सोपार्या साटा मारून नेली
तेथून मोरानं उडान घेतला
जाऊन पडला नारलाचे बनी
नारकाचे बना गोरी कशानं कोमेली
जयाबाईने लगना, नारली साटा मारून नेली
वनातील वनमोरा
उंबराच्या बनाजवळ, रामाने खणली विहीर
त्या ग विहीरीचे गर्दहिरवे पाणी
त्या ग पाण्यावर येती वनातील बनमोरा
पाणी ग पिऊनी मोर संतुष्ट झाला
तेथून मोराने उड्डाण केले
जाऊन थांबला केळीच्या बागेत
केळीच्या बागा, गोरी, कशाने कोमेजल्या...
जयाबाईच्या लग्नसाठी केळी
गोळा करून नेल्या
तेथून मोराने उड्डाण केले
जाऊन थांबला पोफ़ळी बनात
पोफ़ळीचे बन, गोरी, कशाने कोमेजले...
जयाबाईच्या लग्नसाठी सुपार्या
गोळा करून नेल्या
तेथून मोराने उड्डाण केले
जाऊन थांबला नारळी बनात
नारळी बन, गोरी, कशाने कोमेजले...
जयाबाईच्या लग्नसाठी नारळ
गोळा करून नेले
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP