लग्नाची गाणी - काय म्हणणार
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
काय म्हणणार
डोंगरान कबुदर दिसतंय निला निला
रेखा तू सासर्याला ग सासर्याला काय म्हणणार?
-माझ्या मनाने ग मनाने बाबा म्हणणार!
डोंगरान कबुदर दिसतंय निला निला
रेखा तू सासूला ग सासूला काय म्हणणार?
-माझ्या मनाने ग मनाने आई म्हणणार!
डोंगरान कबुदर दिसतंय निला निला
रेखा तू दिराला ग दिराला काय म्हणणार?
-माझ्या मनाने ग मनाने भाऊ म्हणणार!
(कबुदर-कबुतर, निला-हिरवा)
काय म्हणणार
डोंगरतील कबुतर दिसतंय हिरवंगार
रेखा तू सासर्याला ग काय म्हणणार?
-मी मनापासून सासर्याला बाबा म्हणणार
डोंगरतील कबुतर दिसतंय हिरवंगार
रेखा तू सासूला ग काय म्हणणार?
-मी मनापासून सासूला आई म्हणणार
डोंगरतील कबुतर दिसतंय हिरवंगार
रेखा तू दिराला ग काय म्हणणार?
-मी मनापासून दिराला भाऊ म्हणणार
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP