देवाचे लग्नाला
चल बहिणी, चल बहिणी, देवाचे लग्नाला
थांब बंधू, थांब बंधू, मला साडी नेसं दे
चल बहिणी, चल बहिणी, देवाचे लग्नाला
थांब बंधू, थांब बंधू, मला चोली भरू दे
चल बहिणी, चल बहिणी, देवाचे लग्नाला
थांब बंधू, थांब बंधू, मला डोकां उकलू दे
(डोकां उकलणे-केस विंचरणे)
देवाच्या लग्नाला
चल बहिणी, चल बहिणी, देवाच्या लग्नाला
थांब भावा, थांब भावा, मला साडी नेसू दे
चल बहिणी, चल बहिणी, देवाच्या लग्नाला
थांब भावा, थांब भावा, मला चोळी घालू दे
चल बहिणी, चल बहिणी, देवाच्या लग्नाला
थांब भावा, थांब भावा, मला केस विंचरू दे