लग्नाची गाणी - पारख
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पारख
नदीच्या वो मेरे, नदीच्या वो मेरे निलानिला हुला
नवर्याचे बाबा नवर्याचे निघा निघा दारी
सासर्याने सून पारखावी मोंगर्याची कली
नदीच्या वो मेरे, नदीच्या वो मेरे निलानिला हुला
नवर्याचे आई नवर्याचे निघा निघा दारी
सासूनी सून पारखावी गुलाबाची कली
पारख
नदीच्या ग काठावर, हिरवा हिरवा होला
नवरदेवाचे बाबा दारातून निघा निघा
मोगर्याच्या कळीसारखी सून पारखून घ्या
नदीच्या ग काठावर, हिरवा हिरवा होला
नवरदेवाचे आई दारातून निघा निघा
गुलाबाच्या कळीसारखी सून पारखून घ्या
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP