लग्नाची गाणी - कंडाळाची काडी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कंडाळाची काडी
कंडाळाची काडी बाये दादा माझी
सोन्यानं सुतिली बाये दादा माझी
कोणावं ग गेली बाये दादा माझी
हौशी भावल्याने बाये दादा माझी
(कंडाळ-एक प्रकारचे गवत)
गवताची काडी
गवताची काडी, बाई...दादा...माझी
सोन्यात गुंफ़ली, बाई...दादा...माझी
कुणी तिला नेली, बाई...दादा...माझी
हौशी दिराने, बाई...दादा...माझी
गवताची काडी ही धाकट्या बहिणीसाठी योजलेली प्रतिमा.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP