मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
मांगल्या दारी

लग्नाची गाणी - मांगल्या दारी

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


मांगल्या दारी
दरयाने होडी चाले गं, जयू, विचार कुणाचा करते गं
-बाबाचा विचार करते गं
जयू मांगल्या दारी जाऊन लडते गं

दरयाने होडी चाले गं, जयू, विचार कुणाचा करते गं
-आईचा विचार करते गं
जयू मांगल्या दारी जाऊन लडते गं

दरयाने होडी चाले गं, जयू, विचार कुणाचा करते गं
-भावाचा विचार करते गं
जयू मांगल्या दारी जाऊन लडते गं

मागल्या दारी
दर्यातून होडी चालते ग,
जयू विचार कुणाचा करते ग
-बाबाचा विचार करते ग,
जयू मागल्या दारी जाऊन रडते ग

दर्यातून होडी चालते ग,
जयू विचार कुणाचा करते ग
-आईचा विचार करते ग,
जयू मागल्या दारी जाऊन रडते ग

दर्यातून होडी चालते ग,
जयू विचार कुणाचा करते ग
-भावाचा विचार करते ग,
जयू मागल्या दारी जाऊन रडते ग

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP