|
स्त्री. ( काव्य ) सखी ; मैत्रीण आतां सई यशोदेचे द्वारीं हा कोण रथवाला । - होला ११ . सईसई , गोविंदा येतो । मजवर गुलाल टाकीतो । [ सं . सखी ; प्रा . सही ; गुज . सही ; हिं . पं . सिं . सहेली ; सखि - सहि . सइ - ई ; - भाअ १८३४ ] स्त्री. मैत्रीण ; सखी ; स्त्रीभित्र . कटाक्षांची छाया घनतर सये ज्यास पडली । - सारुह ७ . ८२ . रडों नकोचि थांब सये । - मोविराट १ . ९० . [ सं . सखि ] स्त्री. आठवण ; स्मृति ; सय . [ सं . स्मृति ; प्रा . ] स्त्री. १ संमतिदर्शक अथवा आंतील सजकूर कबूल असल्याबद्दल एखाद्या रोख्याच्या , लेखाच्या अथवा पत्राच्या शेवटीं लिहिलेलें स्वतःचें नांव , स्वाक्षरी , सही . ( क्रि० करणें ). २ प्रयत्न ; खटपट ; मेहनत माझे कार्याविषयीं तुम्ही मध्यस्तापासीं सई करावी . - रा १० . १६० . ३ लहान मुलास खेळवितांना प्रेमानें त्याच्या कपाळास आपलें कपाळ लावून लहानसा दिलेला ठोसा ; - वि . १ जिंकलेला ; ताब्यांत घेतलेला ; जित . येरवी वसई सई होती असें नवतें व टोपकर अग्निरूप होते . - पया ४९ . २ फाजील ; फालतू ; पुरून अधिक उरलेला . - अ . खरोखर , बरोबर , खरेंच या अर्थानें हा शब्द योजितात उदा० तो मूर्ख तर सई परंतु चोर नाहीं ; पाऊस पडला सई परंतु भुई काहीं भिजली नाहीं . तसेंच , कर तर खरा , पहा तर खरा या अर्थाहि योजितात . उदा० तूं आधीं माग तर सई मग तो देवो कीं न देवो ; औषध खा तर सई मग गुण तर पाहतोंच आहोंत . त्याचप्रमाणें अर्थात , खचित , व निदानपक्षीं , बस , पुरे या अर्थानेंहि उपयोगांत आणिला जातो . [ अर . सहीह् = निर्दोष ; अर . सअय ] ( वाप्र . ) सई करणें - १ सर करणें ; कबज्यांत , ताब्यात घेणें . किल्ला राज्य सई करणें = किल्ला , राज्य हस्तगत करणें . किल्ला सई करून देतों तुला । - ऐपो ५३ . २ आक्रमण करणें ; एखाद्या ठिकाणास जाऊन पोंचणें . आपण संध्याकालपर्यंत मकाण सई करू . कोण्ही एक माल सई करणें , कोण्ही एक माल सई म्हणण - एखादा जिन्नस घेण्याचें कबूल करणें , निश्चित ठरविण . सामाशब्द - सईन स्त्री. स्मरण ; आठवण ; स्मृति . घाम मुखीचा कोण पुशिल मग सय होइल घरची । - प्रला १२४ . ऐसी पुढील से घेतु । - ज्ञा १ . ७९ . [ सं . स्मृति ; प्रा . सुई ] क्रि.वि. सई पहा . मनासारखें पसंत . स्त्री. ( कर . ) खेळतांना बैदूल , गोटी टाकण्यासाठीं केलेला खळगा ; गल ; बद . सईभरणें - ( कर . ) गलींत गोटी टाकणें .
|