Dictionaries | References

घांग

   
Script: Devanagari

घांग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghāṅga f Remembrance or mindfulness. v ठेव, राख, धर, राह. 2 Recollection or recalling to mind. v ये, अठव. Gen. neg. con. in both senses.
; also a lusty bellower or bawler upon a slight hurt.

घांग     

 स्त्री. १ द्खलगिरि ; सावधानता ; जाणीव . ( क्रि० ठेवणें ; राखणें ; धरणें ; असणें ; राहणें ). त्याला मेजवानीची घांगही नव्हती . - अस्तंभा १३५ . २ आठवण ; आठवणूक ; सई ; स्मरण ; याद . ( क्रि० येणें ; आठवणें ). ( दोन्ही अर्थी सामान्यत : अकरण रूपीं प्रयोग करतात . )
वि.  ( कों . ) १ कांहीं एका गोष्टीविषयीं अंगीं सामर्थ्य असून रडण्याचा स्वभाव असलेला ( मनुष्य ); रडया ; कोणी पैसा मागितला असतांना , काम करावयास सांगितलें असतां नाकारणारा , माघार घेणारा ; रडगाणें गाणारा . २ रडवा ; थोडयाश्या इजेनें मोठी आरडाओरड करणारा .
०चाळे   पुअव . १ ( पैसा देण्याविषयीं , काम करण्याविषयीं अक्षमतेबद्दल ) कुरकूर ; पिरपीर ; रडगाणें . २ ( थोडासा धक्का लागल्यानें दुबळया , अशक्त प्राण्याचें ) केविलवाणें व मोठयानें आक्रोश करणें ; किंकाळी . [ घांग + चाळे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP