|
पु. सबंध हात ; भुज . वरचा हात ; दंड . सरळरेषांनीं बनलेल्या आकृतीची बाजू ; बहुकोणाची बाजू . काटकोन त्रिकोणाचा पाया . भुज शब्द अर्थ ५ पहा . ( नृत्य . ) खांद्यापासून मनगटापर्यंतचा भाग . नृत्यामध्यें बाहूच्या योगानें केले जाणारे पुढील दहा अभिनय सांगितले आहेत - १ अधोमुख , २ ऊर्ध्वसंस्थ , ३ तिर्यक , ४ अंचित , ५ अपविद्ध , ६ प्रसारित , ७ स्वस्तिक , ८ उद्वेष्टित ९ मंडलगति व १० पृष्ठानुसारी . [ सं . ] ०ज पु. क्षत्रिय . प्रभु बाहुजकुलमणि । - आय २८ . [ वै . बाहूराजन्य : कृत : । - ऋग्वे १० . १०८ . ] ०दंड पु. वरचा हात ; दंड . सबंध हात . हीरांगदें शोभति बाहुदंडी । - सारुह ८ . १५२ . [ सं . ] ०बल बळ - न . शरीरसामर्थ्य ; मनगटांतील ताकद - शक्ति ; कपट , मंत्रतंत्र युक्ति इ० निरपेक्ष केवळ शारिरिक शक्ति . [ सं . ] ०भूषण न. दंडांत बांधण्याचा अलंकार . [ सं . ] ०मूल न. खाक ; काख ; बखोटा . [ सं . ] ०युद्ध न. द्वंद्वयुद्ध ; मल्लयुद्ध ; कुस्ती . [ सं . ] ०वट न. हात . - शर . दंडावरील दागिना . वांकि , बाहुवटें , बाजुबंद , बाळी । - आपू १८ . ०वीर्य न. बाहुबल . [ सं . ] ०स्फुरण न. बाहूनां स्फुरण चढणें ; हात शिवशिवणें ( युध्दाकरतां इ० ). [ सं . ] बाहुटा , टी पु न . बाहुमूला ( खाके ) पासून कोपरापर्यंतचा हात . खांद्याच्या सांध्याचा भाग ; बखोटा . स्त्रियांचें एक बाहुभुषण ; वांकी . बाहुळा - पु . ( राजा . ) बखोटा ; बाव्हळा ; बाहू - पु . हात ; भुज . ( अशुद्ध ) बाहूझोंबी - स्त्री . द्वंद्वयुद्ध ; कुस्ती . तुम्हीं बाहूझोंबीं घेतां म्हणोन । - ह १९ . १४० . बाहू फुगणें - ( एक शौर्याचें लक्षण ) हात फुरफुरणें . बाहे - पु . बाहु ; हात . सप्राणें आफळली बाहे । - उषा १४ . १९ . ( ल . ) आधार . मोडूनि श्रद्धेची बाहे । - ज्ञा १७ . ४१४ .
|