|
पु. १ बाण ; तीर . २ मृग नक्षत्रांतील शिवाच्या तीन तार्यांचा आकाशांतील बाण . लुब्धक पहा . - वि . ( ज्यो . ) पांच संख्या ( मदनाचे पंच शर यावरून ). [ सं . ] पु. ( ज्यो . ) १ तार्याचें क्रांतिवृत्तापासून अंतर ; याम्योत्तर अंतर ; शरवृत्ताचा जो क्रांतिवृत्तांशीं पात होतो तो . - सूर्य १२ . [ सं . ] पु. १ ( स्थापत्य ) कमानीची चढ , उंची . कमानीची जाडी ६ इंच असून शर गाळयाच्या एक अष्टमांश असावा - मॅरट १९ . २ ( गणित ) कंसाचीं दोन टोकें सांधणार्या ज्येच्या मध्यापासून तिजवर लंब काढून तो त्या कंसाला मिळे तोंपर्यंत वाढविला असतां , त्या लंबाला त्याच कंसाचा शर म्हणतात . - महमा २९ . उंची . [ सं . ] ०वृत्त न. क्रांतिवृत्ताशीं लंब असणारें वृत्त . - सूर्य १२ . [ सं . ] ०कांड पुन . बाणाची काठी , दांडी , कामटी . [ सं . ] ०सूत्र न. आकाशांतील रेखांशवृत्त [ सं . ] ०जन्मा पु. कार्तिकस्वामी . [ सं . ] ०जाल न. ( काव्य ) बाणाची झोड , वर्षाव ; सरबत्ती ; बाणांचें जाळें . [ सं . ] ०धार पु. बाणांचा पाऊस ; वर्षाव . मेघ वर्षतां जळ शरधारीं । - एभा २१ . ८२ . ०धि पु. भाता ; बाणांची पिशवी . [ सं . ] ०पंजर पु. १ ( काव्यांत अतिशयोक्तीनें वर्णन करतांना ) एखाद्याच्या अंगांत पुष्कळ बाण शिरले म्हणजे हा शब्द योजतात ; देहाला शरांचें पिंजर्याप्रमाणें आवरण . २ बाणांचा पिंजरा , पलंग . [ सं . ] ०पंजरीं न. ( ल . ) ( भीष्माच्या कथेवरून ) मृत्यूच्या द्वारीं खितपत पडणें ; आजारानें , दुखण्यानें झिजत पडणें . २ ज्यांतून बाहेर पडण्यास कोणताच उपाय नाशीं अशा संकटांत पडणें . पडणें न. ( ल . ) ( भीष्माच्या कथेवरून ) मृत्यूच्या द्वारीं खितपत पडणें ; आजारानें , दुखण्यानें झिजत पडणें . २ ज्यांतून बाहेर पडण्यास कोणताच उपाय नाशीं अशा संकटांत पडणें . ०पात पु. १ बाण सोडणें , फेकणें . २ बाणाचें पतन ; बाण येऊन पडणें , आदळणें . ३ बाणांचा वर्षाव . [ सं . ] ०पुंखा स्त्री. बाणाची पिसें ; बाणाचा पिसें लावलेला मागील भाग . [ सं . ] ०फूल न. बाणाचें टोंक , अग्र ; बाणाचें धातूचें पातें [ सं . ] ०वर्ष वर्षाव वृष्टि - पुस्त्री . बाणांचा वर्षाव , भडिमार . [ सं . ] ०शय्या स्त्री. बाणांचा बिछाना . [ सं . ] ०संधान न. बाणाचा नेम ; बाणानें नेम धरणें , साधणें , मारणें . [ सं . ]
|