यशोदा म्हणे श्रीहरी नको जाऊ बाहेरी ॥धृ॥१॥
तुला देते दही दुध साय सख्या घरी बसोनी खाय नको करु कुणाची चोरी ॥२॥
कान्हा म्हणे ऐक माते तुला सांगते सत्ये डाव मांडला यमूना तीरी ॥३॥
तुला देते विटी दांडू आणिक मोत्याचा चेंडू बळीरामाची संगत धरी नको जाऊ बाहेरी ॥४॥