कोण एके दिवशी विनोदाने हरीसी बोले रुक्मीणी कृपा करुनी आधी सांगती विडा देती मग करुनी ॥ तुम्ही थोरांचे आहा परंतु काळे काहो मी गोरी ॥धृ॥
शामसुंदरा बोल-मंजुळा तुळसी माला जड झाल्या माता पित्याने फिरुनी आणीला भ्रतार नाही गड्या मनाजोगा ॥१॥
कृष्ण म्हणूनी सुत गवळ्याचा मजवर भार त्रीभुवनाचा शिशुपाल हा वरतो हेरीला मी नाही तुझ्या कामाचा ॥३॥
एके दिवशी नंदराणीने काळे लावीले गालाला-पुसले नाही तसेच राहीले भक्त गुंतले कामाला ॥४॥
क्रोध आला भिमकबाळीला जमीनीवरती ती लोळे श्रीकृष्णाला करुणा आली कुरुळे केस सावरले ॥५॥