श्रीकृष्ण परमात्मा आज जन्मले मथुरेला ॥धृ॥
देवकी प्रसुत झाली तिज चरुरभुज मुर्ती दिसली पाहूनी आनंद झाला, वासुदेव मनी खिन्न झाला ॥१॥
अंकेवरी घेऊनी त्याला वसुदेव नेतो कृष्णाला, यशोदे पुढे ठेविला घरी आणीली नंदाची बाला ॥२॥
दूत सांगती जाऊनी प्रसुती झाली तुमची भगीनी कंस मामा धावत आला आपटिली शिळेवरी बाला ॥३॥
तव ती वदली आकाशवाणी तुझा वैरी नांदे त्रीभुवनी-शरण जाय श्रीहरिला चरणी ठाव देईल तुजला ॥
श्रीकृष्ण परमात्मा ॥४॥