उन उन खिचडी देवा तुम्ही जेवा हो । तोंडी लावायला पापड तुम्ही घ्या ॥धृ॥
कुलदेहाची शिगडी केली, अहंकाराचे घातिले कोळसे ब्रह्मज्ञानी अग्नी पेटवावा ॥१॥
सद्बुद्धीचे दाळ तांदुळ । दुर्बुद्धीचा धुतला मळ । प्रेमरसाच्या आधणी वैरावा ॥२॥
तुप खिचडी रुक्मीणी तुम्हा वाढी उभा राहूनी हात तुम्हा जोडी । भक्ती भावाचा नैवेद्य घ्यावा ॥३॥