कोणाचे हे घर हा देह कोणाचा । आत्माराम त्याचा तोची जाणे, तोची जाणे ॥ मी तु हा विचार विवेक शोधावा । गोविंद माधवा ध्यास देही ध्यास देही ॥ ध्येय धाता ध्यान त्रिपूटा वेगळा, सहस्त्रजळी उगवला सूर्य जैसा सूर्य जैसा ॥ ज्ञानदेव म्हणे नयनाच्या ज्योती नयनाच्या ज्योती, त्या नामे कपेती, तुम्ही जाणा तुम्ही जाणा ॥ कोणाचे हे घर ॥