चंदनचियो माळी सेज पलंगावरी समया लाविल्या शेजारी वर मोत्याची झालरी-आणिली सोन्याची घंगाळ विसनूनी पाणी जाईजुई, चमेली, मोगरा गुंफूनी ठेवीला हार-नानापरीचे पदार्थ, नानापरीचे पदार्थ, लवंग जायफळ वेलचे वेलदोडे करूनी ठेविले विडे-वाट पहाते मंजरी सत्यभामानारी अभया दरवाज्याबाहेरी आले सुघननिळा अग तू बोलना मंजुळ मी उभा दारी राहतो तुझ्या मंदिरी येतो हरी तुम्ही कोणाचे कोण नाव द्या सांगून तुझा मी गरुडावरी स्वार तुझा भ्रतार सखीने दरवाजा उघडीला येऊनी लागली चरणाला ॥