माता अंजनीच्या पोटी बाळ जन्मले जगजेठी । याची सोन्याची लंगोटी । मुखी रामराम राम । नको जाऊ रे मारुती जरा थांब थांब थांब । आला लंकेच्या भेटी । सीताबाई माऊली साठी पुढे राक्षसांची दाटी वास घाण घाण घाण ॥१॥
रावणाची मंदोदरी सीता रत्न गेले चोरी । विसतिस पूसे ब्रह्मचारी कुठे ठेविले सांग सांग सांग ॥२॥
ऐकावे मारुती नंदी सीता ठेविली अशोक वनामधी । पुढे राक्षसांची बंदी । बहुत कठीण काम काम काम ॥३॥
मारुती गेले तेथे । सीतामाई निद्रीत होत्या । पुढे फेकिती मुद्रिका आले राम राम राम ॥४॥
कर्माची कथा खुटली । मागबंदी तोरी तुटली । कधी भेटेल श्रीराम राम राम ॥५॥
या वनात बहु फळ दृष्टी । बाळ अज्ञान खेळे कुस्ती । पुच्छ होऊनी लांब लांब लांब ॥६॥
माता तुमची आज्ञा घेतो कंद फळे वेचुनी खातो मुंगी होऊनी येथेच राहतो बाळ लहान लहान लहान ॥७॥
अरे अरे मरकुटपरि तू म्हणतोस मी आहे मोठा । तुझ्या नगरीचा न्याय उलटा । सत्य सांग सांग सांग ॥८॥
मारुती गेले तेथे । लंकाजाळूनी दुर झाले । बुडविले समुद्रात शेपूट पुसे घाम घाम घाम ॥९॥
नको जाऊ रे मारुती महान महान महान ।