आम्ही जातो मम ग्रहासी देवा निरोप द्यावा सख्याहारी ॥धृ॥
क्रोध सासरा फार गांजितो कांचन सासू जाच करी । काम पति रे अतिशय छ्ळतो सुख नाही या संसारी ॥१॥
मोह दिराने छळ मांडीला वासना जाळून गळ पडली पुरे पुरे हा जाच सोसेना शरण अली मी मुरारी ॥२॥
शांति माता बोध पित्याने मजला नेले माहेरी प्रेम रसाचा पाजूनी प्याला भक्ती रसाचा पाजूनी प्याला सुखी केले मज निरंतरी ॥३॥
आम्ही जातो मम ग्रहासी देवा निरोप द्यावा सख्याहारी । चरण तुझे सोडुनी जावेना तळामळ तळमळ जीव करी ॥४॥