पहिली गवळण धावत आली यशोदे पाशी बसली । यानी आमची नुकसान केली दही दुधात माती कालविली । आता मारील हो आता मारील सासुबाई हा पडला आमुच्या द्वारी तु सांग यशोदेबाई ॥धृ॥१॥
दुसरी गवळण म्हणाली द्वाड यांच्या घरी पडला नाड । दही दुधाची शिंके तोडी तडा तडा अंगाला झुंबी कडाकडा । याचा विश्वास हो याचा विश्वास मजला नाही ॥२॥
तिसरी गवळण घरची एकटी पाडील्या आमुच्या भिंती । आम्ही गरीब हो, आम्ही गरीब, आम्ही गरीब, आम्हा नाही शक्ती त्याची काय करावी युक्ति मोठा कठीण तुझा शिशुशाई ॥३॥
चवथी गवळण घरची एकटी दाराशी कुलपे ठोकीती त्यासी बसून सांगती गोष्टी याची बुद्धी मोठी खोटी मोठी कठीण गे मोठा कठीण मोठा कठीण तुझा शिशुशाई ॥४॥
पाचवी गवळण उभी आंगणी सांगती ग घरचा धनी घरी नाही तर देव देईना पाणी मोठा कठीण तुझा शिशुशाई ॥५॥
सहावी गवळण उभी आंगणी सातवीला हाका मारीती सोडा गोकुळा गे, सोडा गोकुळ सोडा गोकुळ याच्या पायी हा पडीला अमुच्या दारी ॥६॥