गंगा लहरीचे सार ऐका ऐका दशहार ॥धृ॥
बादशहाचे दरबारी सेवक जननाना परी जगन्नाथ प्रविण द्विती भारी खेळूनी तोषवी राजेश्वरा ॥ ऐका ॥१॥
खेळता दोघे तल्लीन लागली बादशाहा तहान । औरत गोषामध्ये म्हणून लडकीने आणिले जलगार ॥२॥
राय जल प्राशन केले । रीता कलश घेऊनी चाले । पंडीत मन्थन बिंदियेले । राया कोणही सुकूमार ॥३॥
माझी लडकी आवडती । स्वामी म्हणे मज दे मगती । तुम्ही उंच मी हलके याती ।
करीन रमणी निर्धार ॥४॥
राये दिली कन्या त्याला । रात्रंदिन तिजसी रमला । ब्राह्मण दुरीते ठेवियेला । द्विज टाकीती बहिष्कार ॥५॥
गंगातीरी घालूनी शय्या । शयनी लवंगी त्या ठाया । स्नाना आले दिक्षित आप्पाया अरे अरे निंदा हे फार ॥६॥
आपुल्या वस्त्राने झाकीले । स्नान करुनी निघुनी गेले । वस्त्र आप्पाची ओळखीले । गुरुवरीया मजकरी पार ॥७॥
घेई घेई प्रायश्चित कराल लवंगी सह मुक्त नाही तर बसलो । हा स्वस्थ करील गंगाची उद्धार ॥८॥
बावण श्लोक सुरस रचिले स्तुती पर भक्ती रहस्य भरीले । प्रेमे गंगेसी आळविले । झाला काय चमत्कार ॥९॥
दरश्लोके दर पायरीला पाणी चढले त्याकाळा । बावन श्लोक मुखी नाम वदिला । चर्तुभुज गंगा तिरावर ॥१०॥
वात्सल्ये त्या उभयासी गंगेने धरीले हृदयासी जेष्ठ शुद्ध या दशमीसी केला स्वामीचा उद्धार ॥११॥
पाप विमोचन सुरगंगा । दर्शनी पावन करीत जगा । लवंगी सह स्वामीस पदि जागा । त्या गंगेसी नमस्कार ॥१२॥
N/A