राधे झाडीत होती आंगणा कृष्ण मागत होता कंकना ॥ तुम्ही धावा धावा श्री मंदिरी वाजे पावा ॥धृ॥१॥
राधे टाकीत होती सडा कृष्ण मागत होता पेडा ॥२॥
राधा सारीत होती चुल कृष्ण मागत होता फुल ॥३॥
राधा घालीत होती वेणी कृष्ण मागत होता फणी ॥४॥
राधा घालीत होती चोळी कृष्ण मागत होता पोळी ॥५॥
राधा भरीत होती पाणी कृष्ण मागत होता लोणी ॥६॥
राधा करित होती भात कृष्ण मागत होता ताक ॥७॥
राधा उठित होती ताट कृष्ण मागत होता भात ॥८॥
राधा कृष्णाचीया जोडी कृष्ण देवाला राधा आवडी ॥९॥