जो जपे नमोशिवाय मृत्यूचे ना कधी त्या भय ॥धृ॥
भगीरथे गंगा ही आणिली गोतमे गोदावरी आणिली-धृवाने मंत्र हा जपीला जो का अढळपदी बैसवीला ॥१॥
श्रीयाळेज पहा जपीला चिलीया भोजना दिधला जपाने केले अभय मृत्यूचे ना कधी त्या भय ॥२॥
दशरथे जप हा जपीला उदरी श्री राम अवतरला-रामराज्य सुखी झाले त्रिलोकी झेंडा फडकवीला ॥३॥
दास म्हणॆ सकल भक्ताना जपावे रामनामाला करावी जीवनाची सोय मृत्युचे ना कधी त्या भय ॥४॥