पंढरीचा राणा येतो जानाईच्या दारी, जोधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी ॥धृ॥
भक्तासाठी राबोनिया पंढरीचा राणा, शिवारात पिकवितो मोतीयाचा दाणा, मोतीयाचे पाणी भरे कणसाच्या वरी कण साच्या वरी ॥१॥
जनाईच्या जात्यावरी गावूनीया गाणी, पांडुरंग गेला रानी वेचायाला शेणी, जनी म्हणे काय देवू विठ्ठला न्याहारी ॥२॥
देव मागे जनीपासी जोंधळा भाकरी, अमृताची चव त्याला काय पण गोडी, भक्ताचिया प्रेमासाठी करीतो चाकरी ॥३॥