नमो आधी रुप ओकांर स्वरुपा वाहू माळबुक्का प्रेमभावे ॥धृ॥
मन हा मोगरा चित्त हे शेवंती वाहिल्या तुळशी प्रेमभावे ॥१॥
भावे केले गंध भक्तीच्या अक्षदा वाहिल्या तुळशीच्या अच्युत निढळावरी ॥२॥
कामाचा हा धूप प्रेमाचा हा दीप निरुजनी रूप पाहू डोळा ॥३॥
तुका म्हणे ऐसे पूजन करावे ठेवावे हृदयी माझ्या राहावे पांडुरंगा ॥४॥