जो जो सख्या श्रीकृष्णा करी निद्रा मनमोहना, जो जो सख्या श्रीकृष्ण ॥धृ॥
गोप सांगे गौळणीला पुत्र यशोदाला विष्णु जगी अवतरला बाळ यशोदेचा तान्हा ॥१॥
तोरणे गुड्या-घरोघरी वाजतो चौघडा दारी-जमवूनी सुहासीनी नारी गाती मंजुळ गाणी ॥२॥
रत्नाचा पालक आणिला मोतीक मयूर कळसाला-कनकाची दोरी त्याला किनखापी आत बिछाना ॥३॥
भरी लागे चौक मोत्यानी वरी बसली यशोदा जननी लागे कृष्णासी घालूनी लेणी बाळ यशोदेचा कान्हा ॥४॥
कंचुकी यशोदा लागे कृष्णासी झबले अंगे हे झुल श्रीहरी जोगे ओट्या भरी गोपांगना ॥५॥
कुणी घ्यागे गोविंद गोपालाला कुणी घ्यागे मधुसूदनाला कुणी केला हरी पाळणा ॥
जो जो संख्या श्रीकृष्ण करी निद्रा ॥६॥