वारकरी हा नेम धरुनिया जातो वारीला हो जातो वारीला चालली दिंडी पंढरीला ॥धृ॥
पखवाजावर अभंग गातो । ठेक्यावरती टाळ वाजतो । भिवरेच्या तटी देव नाचतो । त्याला भेटायला हो त्याला भेटायला । ब्रह्मानंदी टाळी लागली । वाटचाल कधी संपून गेली कधी भेटली विठू माऊली । कळले ना त्याला हो कळले ना त्याला ।