हाती पिचकारी घेऊनी तुम्हावरी रंगी हरी टाकीन-करी हारतुरे गुंफुनी गळ्या मी आज घाली हौसेन-तुम्ही समुद्र-मी शिंपला बोलते राधा श्रीहरीला । आज गडे वसंत खेळू चला बोलते राधा श्रीहरीला ॥धृ॥१॥
तूची चंदन महीलागिरी सुवासिक केशर मी कस्तुरी तुम्ही मोहन मी बांसरी नाजूक शोभे तुमच्या करी-जस चंद्रवदन रेखला बोलते राधा श्रीहरीला ॥२॥
तेथे होती मज एक गामिनी क्रिडा तिसी खेळे सारंगधर-इतके ऐकूनीया सत्बर बोलला सखा कृष्ण यदुविर-तुम्ही हजार मी एकला बोलते राधा श्रीहरीला ॥३॥
हरीसहित गज गामिनी मिळाल्या बारा-सोळा जणी-आपुल्याला रंग घेऊनी निघाल्या सर्वच वृंदावनी श्रीरंग रंगरंगीला बोलते राधा श्रीहरीला आज गडे वसंत खेळु चला बोलते राधा श्रीहरीला ॥४॥