विसनूनी पाणी त्यामधी वाळा सारुनी घंगाळा हरी सारुनी घंगाळा, कुंकू केशर वर बुक्याची रांगोळी हरीवर बुक्याचे रांगोळी, मखमल मंडप शोभीवंत वर मोत्याची झालरी हरीवर मोत्याची झालरी हा तुजला आवडणार देवा धर्म घरी जाशील, त्यांचे घोडे तूची धुशील ऐसा स्वभाव तुजपासी हरी ओ स्वभाव तुजपासी-बोले रुक्मीणी चक्रवर पाणी कशात भुललासी, हरी ओ कशात भुललासी ॥१॥
सोजीच्या मी करंज्या केल्या तुपात तळूनी हरी ओ तुपात तळूनी हा तुजला आवडाणार देवा, विदुर घरी जाशील त्यांच्या शीळ्या कण्या खाशील ऐसा स्वभाव तुजपासी हरी ओ स्वभाव तुजपासी ॥२॥
चहूबाजूनी रंगीत पलंग वर जळत्या समया रुक्मीणी शेजारी लक्ष्मीपण पाय दाबाया हरी ओ पाय दाबाया हा तुजला आवडणार देवा जनी घरी जाशील तीचे तू पाय दाबशील ऎसा स्वभाव तुजपासी हरी ओ स्वभाव तुजपासी ॥३॥