जय जय गोपाळ नंदलाला राधा रमण बंसीवाला ॥धृ॥
मोर मुकुट कुंडल शोभे मुखामध्ये मुरली मधुर बोले, गळ्यामध्ये वैजयंती माळा ॥१॥
रुप दिसत सुंदर, कासे कटीला पितांबर, काळी घोंगडी शोभे त्याला ॥२॥
गोपगौळणीचा कान्हा नंद यशोदेचा बाळ तान्हा, कंस मामा हो याने मारीला ॥३॥
कृष्ण देवाची अगाध लीला, वर्णीता वर्णीता ब्रह्मा शिणला, शांता लागे हरी चरणाला ॥४॥