यशोदेच्या पोरा नको जाऊ चोरा फोडूनी माझा माठ काय सांगू सासूला काळा तो काळा फिरविशी डोळा फोडून माझा माठ काय सांगू सासूला ॥१॥
रे वनमाळी वाजवितो टाळी फोडूनी माझा माठ ॥२॥
गवळण बाई दहीदूध आणी फोडूनी गेला माठ काय सांगू सासूला ॥३॥
यमुनेच्या तिरी गऊ चारा चरी वाजवितो मधुर मुरली काय सांगू सासूला ॥४॥
यमुचेच्या धारी राधा स्नान करी, झाडावर ठेविले वस्त्र कशी जाऊ मी घराला ॥५॥
यमुनेच्या तिरी नागफणी काढी जाऊनी उभा डोक्यावरी भिती दाखवी राधेला ॥६॥
आत्या हो बाई रागावू नका हा सर्व गुन्हा कृष्णाचा काय सांगू तुम्हाला ॥७॥