पती विणा जाऊ कशी आज मी घरा । जाऊनीया काय कथू सासू- सासर्या - जारे मला का तु म्हणसी आज भास्करा नेसी कुठे नेसी कुठे आज प्रियकरा । पतीविण जग सर्व शून्य भासते । कर जोडूनी मी चूडेदान मागते ॥१॥
अंध माझे सासू श्वसूर दीन असती । एका पुत्राशिवाय त्यासी नाही संतती । तेही रत्न हिरावोनी काय नेतोसी । एवढे मी पार्थीतसे सौभाग्य दे मसी ॥२॥
पांचवर तुजसी दिले जाई तू घरा पाच पुत्र तुजसी शोक आवरी जरा । होती कसे पाच पुत्र नेतोसी प्रियकरा ॥३॥
दिलेस वचन परत कधी असत्य होईना वचन मोडेन हे किती किती अधर्म पण । किती अंत पाहसी आता सुर्यनंदन ॥४॥
सर्व वर तुजसी दिले जाई तूं सती । येऊ नको माझ्या मागे ने तुझा पती आज घरा आले आनंद जाहला ॥५॥