बाळा जो जो रे ज्ञानेशा चिदत्नप्रकाशा बाळा जो जो रे ॥धृ॥
ज्ञानेश्वर बोध सकलाना करुनी कौतुक लीला रेड्यामुखी वेद वदविला गर्व द्विजांचा हरला ॥ बाळा जो जो रे ॥१॥
बाळ जन्मले गुणयशी रुख्मीणीचे कुशी-येऊनी जगताला उपदेशी सायुज्य मुक्तीदेशी ॥ बाळा जो जो रे ॥२॥
चालवी जड भिंती चहू मुर्ती-चांगा हरली भ्रांती ॥ बाळा जो जो रे ॥३॥
बाळ जन्मले कवीराशी भाद्रपदाचे मासी कपीला षष्टीचा ये योग ग्रंथा देई जन्म ॥ बाळा जो जो रे ॥४॥
समाधी समयाला सुखर येती विश्वंभर जीवशिव ते एकसर किर्ती राही अमर॥ बाळा जो जो रे ॥५॥
ऐसा पाळणा गाईला बाळा ज्ञानेशाला विठ्ठल रखुमाई मातेला प्रणाम हा सकलाना ॥६॥ बाळा जो जो रे ज्ञानेशा ॥
N/A