नाच रे देवा भक्तांच्या मेळ्यात नाचरे देवा संताच्या मेळ्यात नाच रे देवा नाच ॥धृ॥
नामदेवा किर्तनी रंगला रे पांडुरंग किर्तनी दंगला रे । पुंडलिकासाठी उभा वाळवंटी । युगा युगाचा दास ॥१॥
सखूबाई गेली पंढरीला तिच्या संगे हा नटल झाला सासुरवासी धुणे भांडी घासी सोसोनी सासूरवास ॥२॥
तुकोबाची गाथा राखली रे सावत्याची भाजी खुडली रे । जनाबाई संगे गाणे गावू लागे । दळण दळोनी साथ ॥३॥
एकनाथ घरी राबतोरे कावडीने पाणी वाहतो रे । कसाबाई छंद उगाळीतो गंध लक्ष्मीचा हा नाथ ॥४॥
सुदाम्याचे पोहे खाल्लेरे अर्जुनाचे घोडे धुतले रे । दामाजी साठी महार जगजेठी । येवोनी दरबारात ॥५॥
द्रोपतीला वस्त्रे पुरविले घर्माघरी उष्टे काढीयेले सोसीनी भार करी दीनोद्धार । भक्ताचा हा नाथ ॥६॥
ब्रह्मस्वरुपी मज दिसलेरे । तप्तदी लीन मी झाले रे । लिला म्हणे देवा घ्यावी माझी सेवा रुख्मीणीचा हा नाथ । नाच रे देवा भक्तांच्या मेळ्यात ॥७॥