सोड जाऊ देरे मजला, सोड जाऊ देरे मजला किती वेळा सांगु मी तुजला, सोड जाऊ देरे मजला ॥धृ॥
सासु माझी अशी तशी किती सांगू ऋषीकेशी धावत येई आल्या केशी सोड जाऊन देरे मजला ॥१॥
नणंद माझी येईल आता घरी जाऊनी सांगेल बाता सोडी सोडी रे अनंता जाऊन दे रे मजला ॥२॥
दिरभायाची जाचणी किती सांगू चक्रपाणी । सोड कृष्णा माझी वेणी सोड जाऊन देरे मजला ॥३॥
पती माझा रागीट पुरे पुरे तुझा हट्ट सोड मथुरेची वाट सोड जाऊन देरे मजला ॥४॥
काल माझा चेंडू घेऊनी कुठे ठेवी लागे लपवोनी आधी दे चेंडू मग जा सदनी सोड जाऊन देरे मजला ॥५॥
कोणी धरीली गे तुझी वाट तू जा घरी आपुल्या नीट एका जनार्दनी राम बोला सोड जाऊन देरे मजला सोड जाऊन दे ॥६॥