दृष्टीसी नेहमी माझ्या जग हे दिसे अनेक, माझा मला मिळाला तो पांडुरंग एक ॥धृ॥
कोणी न साथ देती कोणी न येत संगे, कोणी न सोडविती त्या कठीण रे प्रसंगी हरिनाम एक सत्य जग हे आहे क्षणैक ॥१॥
देवाचे हे उपकार मानव जन्म अमोल फार, सर्वची आहे मिथ्या हरिनाम एक सार देवाने दिले स्वर गीत गाईन अनेक ॥२॥
नको देवा तुमची माया पडते मी तुमच्या पाया, शरण मी आले देवा तन मन धन काया, सोडोनी अव्दैत मनी भाव धरुनी एक ॥३॥
माहेरी जावे वाटे मना माझ्या हो आनंद, कधी न्यावया येईल बंधू माझा हो गोविंद विठ्ठल मायबाप रुक्मीणी त्यांची लेक ॥४॥