शंकर पार्वती शब्दाला शब्द देती ॥धृ॥
पार्वती म्हणे हो ईश्वरा मी म्हणते अर्थ करा ।
कोणाला बांधीत होते कोणाला सोडीत होते कोणाला कडे घेऊनी मी मंदिरी जात होते ॥१॥
गाईला बांधीत होती, वासराला सोडीत होती, दुधाची चरवी घेऊनी तू मंदिरी जात होती ॥२॥
कोणाला लावीत होते, कोणाला घालीत होते, कोणाच्या भिंगाकडे मी पाहून हसत होते ॥३॥
कुंकूला लावीत होती काजळाला घालीत होती, आरशाच्या भिंगाकडे तू पाहुन हसत होती ॥४॥
कोणाला ओतीत होती, कोणाला झेलीत होते, कोणाच्या छंदापुढे मी थय थय नाचत होते ॥५॥
दह्याला ओतीत होती, लोण्याला झेलीत होती. रवीच्या छंदापुढे तू थई थई नाचत होती ॥६॥
कोणाला हात देते होते, कोणाला पाय देते कोणाच्या शेजेवरती मी निद्रा करीत होते ॥७॥
मिनार्याला हात देत होती, उतर्याला पाय देत होती, शंभुच्या शेजेवरती तू निद्रा करीत होती ॥८॥
N/A