मरणही ये तरी वरिन मोदे - मरणही ये तरी वरिन मोदे जन...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
मरणही ये तरी वरिन मोदे
जननिचे परि जगी यश भरु दे॥ मरणही....॥
वीट वन्हित पडे
दृढ तरी ती घडे
तेज कष्टे चढे
हे कळू दे॥ मरणही....॥
हाल होवोत ते
चित्त ना मुळि भिते
दास्य जे जाळते
नष्ट करु दे॥ मरणही....॥
-अमळनेर, ऑगस्ट १९३१
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2018
TOP